Raigad

[atlasvoice]

पूर्वी कुलाबा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा रायगड हा महाराष्ट्रातील कोकण विभागात स्थित आहे आणि त्याचे मुख्यालय अलिबाग येथे आहे. या जिल्ह्यात पनवेल, कर्जत, नवी मुंबई, खोपोली, श्रीवर्धन आणि महाड यांसारखी महत्त्वाची शहरे आहेत. “रायगड” हे नाव मराठा साम्राज्याची पहिली राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले. पूर्वी “रायरी” म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला पश्चिम घाटातील दाट जंगलांमध्ये वसलेला असून त्याच्या भौगोलिक आणि ऐतिहासिक महत्त्वाची साक्ष देतो.

रायगड हा ऐतिहासिक स्थळे, निसर्गरम्य समुद्रकिनारे, चित्तथरारक निसर्गसौंदर्य आणि पश्चिम घाटातील समृद्ध जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. या भागात अष्टविनायक मंदिरे, एलिफंटा लेणी यांसारखी सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळे असून ही स्थळे या प्रदेशाच्या आध्यात्मिक वारशाची साक्ष देतात. तसेच रायगड हा विविध धर्म, बोलीभाषा आणि संस्कृतींच्या लोकांचा संगमस्थळ आहे. ऐतिहासिकदृष्ट्या येथे बेने-इस्रायली ज्यू समाजाचा मोठा प्रभाव राहिल्यामुळे या भागाची सांस्कृतिक समृद्धी अधिक वाढली आहे.

रायगड जिल्ह्यात रायगड किल्ला, कुलाबा किल्ला, मुरुड-जंजिरा किल्ला आणि सुधागड किल्ला यांसारखे भक्कम किल्ले आहेत. जे या प्रदेशाच्या लष्करी आणि राजकीय इतिहासाचा मागोवा घेण्यास मदत करतात. शिक्षणाच्या क्षेत्रातही रायगड अग्रेसर आहे. महाराष्ट्रातील एकमेव तंत्रज्ञान विद्यापीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगडमध्ये स्थित आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशासोबतच, रायगड हा आधुनिक औद्योगिक आणि वैज्ञानिक प्रगतीच्या दृष्टीनेही वेगाने विकसित होत आहे. येथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे औद्योगिक संकुले आणि संशोधन संस्था आहेत ज्यामुळे हा जिल्हा प्रगतीपथावर पुढे जात आहे.

रायगड जिल्ह्याचा इतिहास

रायगडचे भौगोलिक स्थान त्याच्या व्यापारी आणि लष्करी महत्त्वाची साक्ष देते. प्राचीन काळात हा प्रदेश व्यापार केंद्र म्हणून ओळखला जात असे ज्याला सह्याद्री पर्वतरांगांमधून महत्त्वाचे प्रवेशमार्ग होते. १४ व्या शतकात या भागात संरक्षणात्मक किल्ल्यांची स्थापना करण्यात आली ज्यामुळे त्याचे लष्करी महत्त्व अधिक दृढ झाले. रायगड किल्ल्यासह अनेक किल्ले या जिल्ह्याच्या ऐतिहासिक व रणनीतिक भूमिकेचे प्रतीक आहेत.

रायगडच्या इतिहासात सतत राजकीय उलथापालथ आणि सत्तांतरे घडली. कोकण आणि दख्खनच्या वेगवेगळ्या सत्ताधीशांनी या प्रदेशावर राज्य केले. व्यापार मार्ग बदलत असताना अनेक संघर्ष उद्भवले. शिलाहार, चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादव यांसारख्या राजवंशांच्या उदयास्तामुळे या प्रदेशाचा सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध झाला.

१७ व्या शतकात मुघल सत्तेचा ऱ्हास झाल्यानंतर रायगड मराठा साम्राज्याच्या नियंत्रणाखाली आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडला आपल्या राजधानीचे रूप दिले आणि हा प्रदेश मराठ्यांच्या सत्तेचा केंद्रबिंदू बनला. मात्र १८ व्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रभावाखाली मराठ्यांचे पतन झाले आणि रायगड ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. इंग्रजांच्या अधिपत्याखाली रायगडमध्ये नागरीकरण आणि आधुनिकीकरण घडून आले.

रायगडच्या ओळखीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याचा मराठा साम्राज्याशी असलेला संबंध. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी राहिलेला रायगड किल्ला आजही इतिहासाचा साक्षीदार आहे. या किल्ल्याच्या महत्त्वामुळेच जिल्ह्याचे नाव बदलून रायगड ठेवण्यात आले जे मराठ्यांच्या सत्तेच्या प्रभावाचे प्रतीक आहे. आजही मराठ्यांचा गौरवशाली इतिहास रायगडवासीयांसाठी अभिमानाचा विषय आहे.

ब्रिटिश काळात रायगडमध्ये प्रशासकीय आणि पायाभूत सुविधा विकसित करण्यात आल्या. १८६९ मध्ये जिल्ह्याची स्थापना करण्यात आली आणि तो ब्रिटिशांच्या वसाहतीतील महत्त्वाचा भाग बनला. नैसर्गिक सौंदर्य लक्षात घेऊन ब्रिटिशांनी येथे पर्यटनाचा विकास केला. गिरीस्थान, तलाव, समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक किल्ले यांमुळे रायगड पर्यटनासाठी लोकप्रिय बनला, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. आजही रायगडचा ऐतिहासिक वारसा त्याच्या किल्ल्यांमधून, निसर्गरम्य स्थळांमधून आणि महत्त्वाच्या स्मारकांमधून स्पष्टपणे जाणवतो. यामुळेच इतिहासप्रेमी आणि पर्यटकांचे हे आवडते ठिकाण बनले आहे.

रायगडमधील प्रमुख पर्यटन स्थळे

  • धार्मिक स्थळे
    वरदविनायक मंदिर: वरदविनायक मंदिर हे अष्टविनायकांपैकी एक असून ते श्री गणेशाला समर्पित आहे. पौराणिक कथेनुसार हे मंदिर किंवा त्याचा जीर्णोद्धार पेशवाईतील सेनापती रामजी महादेव बिवलकर यांनी इ.स. १७२५ मध्ये केला. मंदिराच्या गर्भगृहात गणपतीच्या मुख्य मूर्तीसोबत नवग्रह देवता, मूषक आणि शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
    बल्लाळेश्वर मंदिर, पाली: अष्टविनायकांपैकी एक असलेले बल्लाळेश्वर गणपती मंदिर रायगड जिल्ह्यातील पाली गावात आहे. हे मंदिर कर्जतपासून सुमारे ६० कि.मी.अंतरावर असू, सरसगड किल्ल्याजवळ आणि अंबा नदीच्या किनारी स्थित आहे. या मंदिराला ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे.
    हरिहरेश्वर मंदिर: रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर भगवान शिवाच्या कृपेशी संबंधित मानले जाते आणि पेशव्यांनी इ.स. १७२३ मध्ये त्याचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर पेशव्यांचे कुलदैवत मानले जाते आणि त्यामुळेच त्याला विशेष महत्त्व आहे.
    सुवर्णगणेश मंदिर: या मंदिराजवळील नारळ बागेच्या खोदकामादरम्यान तांब्याच्या पेटीत एक सुवर्ण गणेशमूर्ती आणि काही अलंकार सापडले. ही सुवर्णमूर्ती अंदाजे ३०० ते ४०० वर्षांपूर्वीची असावी असे स्थानिक लोक सांगतात. सुमारे १ किलोहून अधिक वजन असलेली ही सुवर्ण गणेशमूर्ती भक्तांसाठी विशेष आकर्षण आहे.
  • रायगडमधील किल्ले
    रायगड जिल्ह्यात अनेक ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे किल्ले आहेत. हे किल्ले विविध ऐतिहासिक कालखंडांमध्ये लष्करी आणि रणनीतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरले. विशेषतः मराठा साम्राज्याच्या काळात या किल्ल्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.आजही हे किल्ले भारताच्या समृद्ध वारशाची साक्ष देत उभे आहेत. खाली रायगड जिल्ह्यातील काही प्रमुख किल्ल्यांची माहिती दिली आहे.
    रायगड किल्ला: महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या किल्ल्यांपैकी एक असलेला रायगड किल्ला महाडपासून सुमारे २५ कि.मी.अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात आणि मराठा इतिहासात या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचा जीर्णोद्धार करून त्याला आपल्या साम्राज्याची राजधानी घोषित केली. डोंगराच्या शिखरावर वसलेल्या या किल्ल्यावरून परिसरातील निसर्गरम्य दृश्ये आणि गंगा सागर तलावाचा सुंदर देखावा दिसतो.पर्यटकांच्या सोयीसाठी येथे रोप-वे ची सुविधा उपलब्ध आहे. ज्यामुळे किल्ल्यावर सहज पोहोचता येते.
    मुरुड-जंजिरा किल्ला: अरबी समुद्रातील एक अत्यंत मजबूत आणि अभेद्य जलदुर्ग म्हणून मुरुड-जंजिरा ओळखला जातो. मुरुडजवळील राजपुरी बंदरातून नौकेद्वारे या किल्ल्यावर जाता येते. हा किल्ला भारतीय आणि युरोपियन बनावटीच्या तोफा आणि मजबूत तटबंदीने संरक्षित आहे. त्याला दोन प्रमुख दरवाजे आहेत. एक राजपुरी किनाऱ्याच्या दिशेने आणि दुसरा समुद्राच्या दिशेने. जो सुटकेसाठी वापरण्यात येत असे. हा किल्ला भारतातील सर्वात भक्कम सागरी किल्ल्यांपैकी एक मानला जातो.
    कोळाबा किल्ला: अलिबागच्या सागरी किनाऱ्यालगत असलेला कोळाबा किल्ला मराठा नौदलासाठी महत्त्वाचा होता. मराठा साम्राज्यात या किल्ल्याचा उपयोग सागरी मोहिमांसाठी करण्यात येत असे. या किल्ल्याचे दोन मुख्य दरवाजे आहेत. एक समुद्राच्या दिशेने आणि दुसरा अलिबाग शहराच्या दिशेने. विशेष बाब म्हणजे या किल्ल्यात गोड्या पाण्या विहिरी आहेत. जे समुद्रकिनारी असलेल्या किल्ल्यांसाठी दुर्मिळ वैशिष्ट्य आहे.
    सुधागड किल्ला (भोरपगड): पुण्याच्या पश्चिमेस सुमारे ५० किमी आणि लोणावळ्याच्या दक्षिणेस २५ किमी अंतरावर रायगड जिल्ह्यातील पाली गावाजवळ हा किल्ला वसलेला आहे. सुरुवातीला याला भोरपगड म्हणून ओळखले जात होते पण शिवाजी महाराजांनी त्याचे नाव बदलून सुधागड ठेवले. किल्ल्याच्या पठाराला तीन वेगवेगळे विभाग आहेत ज्यामुळे त्याचे सैन्य रणनीतीसाठी विशेष महत्त्व होते.
    हे किल्ले आजही पर्यटकांसाठी, इतिहासप्रेमींसाठी आणि गिर्यारोहकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत.
  • निसर्ग पर्यटन
    चवदार तळे (महाड): रायगड जिल्ह्यातील महाड शहरात वसलेले चवदार तळे सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी आपल्या अनुयायांसह येथे पाण्याचा पहिला घोट घेतला आणि सर्व जातीय लोकांसाठी पाणी मिळण्याचा हक्क अधोरेखित केला. हा सत्याग्रह सामाजिक समतेच्या चळवळीची सुरुवात मानला जातो. आजही हे ठिकाण सामाजिक न्याय आणि इतिहासाचा एक महत्त्वाचा प्रतीक म्हणून ओळखले जाते.
    माथेरान: घनदाट जंगलांनी वेढलेले माथेरान हे एक अप्रतिम डोंगरमाथ्यावरील थंड हवेचे ठिकाण आहे. येथे पोहोचण्यासाठी पर्यटक दोन तासांच्या टॉय ट्रेन प्रवासाचा आनंद घेऊ शकतात किंवा ११ किमी जंगलातील रोमांचक ट्रेकिंगचा अनुभव घेऊ शकतात. माथेरानमध्ये घोडेस्वारी करण्याचा अनोखा आनंद लुटता येतो तसेच येथे स्थानिक काठी व चामड्याच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी खास बाजारपेठ उपलब्ध आहे.
    रायगड जिल्ह्यातील ही दोन्ही ठिकाणे इतिहासप्रेमी, निसर्गप्रेमी आणि साहसप्रेमी यांच्यासाठी एक अनोखी अनुभूती देणारी ठरतात!
  • रायगड जिल्ह्यातील सुंदर समुद्रकिनारे
    अलिबाग बीच: अलिबागमधील मुख्य समुद्रकिनारा विस्तीर्ण आणि सपाट असून लांब पायी फिरण्यासाठी अतिशय उत्तम आहे. आठवड्याच्या सुरुवातीस हा किनारा तुलनेने स्वच्छ आणि कमी गर्दीचा असतो. येथे वाळू काळसर आणि कठीणसर असल्याने वाळूचे किल्ले बांधणे थोडे कठीण होते. येथे भरतीच्या वेळी सर्व बाजूंनी पाणी वाढते.
    मांडवा बीच: अलिबागच्या उत्तरेकडे १०-१५ मैलांवर असलेला मांडवा समुद्रकिनारा मुंबईपासून सहज पोहोचण्याजोगा आहे. निळ्याशार समुद्राचा अथांग विस्तार आणि स्वच्छ किनारा पर्यटकांना आकर्षित करतो. स्वच्छ आकाश असल्यास येथे गेटवे ऑफ इंडिया देखील स्पष्टपणे दिसते. मांडवा गावातील नारळाच्या बागा आणि शांत वातावरणामुळे हे ठिकाण अधिक रम्य वाटते.
    किहीम बीच: प्रकृती प्रेमींसाठी किहीम बीच म्हणजे निसर्गाचा खजिना आहे. येथे दाट झाडीमध्ये रंगीबेरंगी फुलं, दुर्मिळ फुलपाखरं आणि अनेक प्रकारचे पक्षी दिसतात. इतिहासप्रेमींसाठी अलिबागपासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेले चौल हे ठिकाण नक्कीच भेट देण्यासारखे आहे. चौलमध्ये पोर्तुगीजकालीन अवशेष, बौद्ध लेण्या, हमामखाना, चर्च, मंदिरे आणि अगदी एक ऐतिहासिक यहुदी प्रार्थनास्थळ देखील आहे.

रायगड जिल्ह्यातील हे नयनरम्य किनारे तुम्हाला निसर्गाचा, इतिहासाचा आणि शांततेचा मनमुराद आनंद देणारे आहेत!

रायगडला भेट देण्यासाठी उत्तम वेळ

तपशील सर्वोत्कृष्ट भेट देण्याची वेळ
कोणता कालावधी सर्वोत्तम? ऑक्टोबर ते मार्च (थंड हवामानाचे महिने)
थंड हवामानात का भेट द्यावी?   ऐतिहासिक स्थळे आणि निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी आल्हाददायक हवामान

  ट्रेकिंग किंवा रोपवेचा आनंद घेण्यासाठी सर्वोत्तम वेळ

कधी टाळावे?   उन्हाळा (मार्च ते जून): तापमान ५०°C पर्यंत जाऊ शकते, खूप उष्णता

  पावसाळा: जोरदार पाऊस होण्याची शक्यता, प्रवास आणि बाहेरील  उपक्रमांमध्ये अडथळे येऊ शकतात

रायगड जिल्हा तुमच्या प्रवासाच्या यादीत का असावा?

रायगड हा इतिहास, संस्कृती आणि निसर्गसौंदर्य यांचा उत्तम संगम आहे. मराठा साम्राज्याच्या हृदयस्थानी असलेला रायगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी होता. हा किल्ला केवळ ऐतिहासिक महत्त्वाचा आहेच पण निसर्गरम्य दृश्य आणि रोप- ची सुविधाअसल्यामुळे तो इतिहासप्रेमी आणि साहसप्रिय प्रवाशांसाठी एक आवर्जून पाहण्यासारखे ठिकाण आहे.

इतिहास आणि निसर्गरम्य ठिकाणांव्यतिरिक्त, रायगडची बहुसांस्कृतिक ओळख विविध धार्मिक आणि सांस्कृतिक प्रभावांमुळे समृद्ध आहे. रणगड किल्ले, शांत तलाव (चवदार तळे), आणि ऐतिहासिक स्मारके यांसह रायगड एक संपूर्ण प्रवास अनुभव देते. जो इतिहास, संस्कृती, निसर्ग आणि साहस यांचे एकत्रित मिश्रण आहे.

Travel Essentials

Here are the travel essentials one should know

Weather

26 - 39°C

Ideal Duration

1 day

Best Time

November to March

Planning a Trip?

Know how to reach

Top Attractions

Discover the beauty and culture of Maharashtra through our curated experiences

Raj Bhawan

Do you want to feel the royalty in the air? Raj Bhawan is the place! It is the place from where Shivaji administered his kingdom, which is one of the most beautiful places to visit in Raigad. It has such a charming atmosphere that you can feel the old world wandering around here and there. With brilliant architecture, Raj Bhawan is a grand building with beautiful rooms and corridors, once used by the royal family.

Kondana Caves

Kondana Cave is surrounded by thick, verdant forests, Kondana Caves is located near Kondana Village in Maharashtra. Do you want to get lost in the mesmerizing cave architecture?? The caves are famous for their intricate carvings which are associated with Buddhismdate (back to the 1st Century BC), it shows an excellent display of stone-cut structures which is a must-visit for history and architecture lovers.

Diveagar Beach

Do you want a really good place to chill on and feel the breeze? Come to Divegar Beach. It is located on the Konkan coast, with the mesmerizing view of the sparkling sea and hot sand with its scenic landscape, this is a great place for picnics too. People visit here also to see a number of seagull birds which migrate here and are lovely to see.

Gangasagar Lake

Gangasagar lake. Wow! So beautiful. Want to get mesmerized by some natural beauty?? It is all about Gangasagar Lake. It is a man-made lake near Raigad Fort, having a beautiful scenic view that is irresistible. It was made to fulfill the need for water for villagers of nearby villages and the royal family. Moreover, it is believed that waters from River Ganga were brought here to fill this pond.

Jagadishwar Temple

Do you want to bless your eyes and soul with some beauty? Come to Jagadishwar Temple. It is located near Raigad Trail and is an important shrine to be visited in Raigad as Constructed during the time of the great Maratha king Chhatrapati Shivaji, which has a depiction of Hindu-Muslim unity and has brilliant architecture. Lord Shiva is worshipped as Shri Jagadeshwar.

Takmak Trek

Do you love trekking?? You will love to visit Takmak Trek. It takes you to one of the most marvelous views witnessed from tourist places in Raigad situated near Raigad Fort having an elevation of 1200 ft. It is famed in history as a place where criminals were executed in the past. This place has beautiful scenery and pleasant weather to die for.

Morbe Dam

Morbe Dam is a nice spot to seek some adventure in Malshej, which is built on the Dhai River near Khalapur. It is a popular weekend getaway and has been used as a shooting place for various Bollywood movies for its scenic beauty. It is such a lovely and refreshing place to visit in monsoon time.

Sagargad Fort

Sagargad hill fort is located amidst lush and thickly forested expanses offering beautiful sea views in Alibaug. Want to experience trekking in mesmerizing green scenery? Come to Sagargad fort!! It is said that prisoners were hurled to their death from the monkey point at the fort. A beautiful waterfall, a temple, and a water tank on the way to the fort make the trek to the fort more enjoyable.

Queen's Palace

Oh! Here comes The queen's palace!! Royalty. Woah! The Queen's Palace is also famous as 'Rani Vasa', it is a section of Raigad Fort. It is one of the must-visit tourist places in Raigad for history stuff. It was once used by the royal queens of Shivaji. Built with wood, the interior of this place is still in great condition and captivates the tourists. It comprises six chambers which are equipped with all the facilities and in some places it boasts of having beautiful minarets.

Raigad Museum

Raigad Museum in Hirkani Wadi is the ultimate place to actually get immersed in the history and culture of Raigad. It has kept all of the valuable and ancient items associated with Raigad. One of the well-known places to visit in Raigad, this place is definitely not to be missed if you are a history lover.

Murud Janjira

Murud-Janjira Fort is located in the Raigad district of Maharashtra, India. It sits on an island about 1.5 kilometers (1 mile) off the coast of Murud, which is approximately 165 kilometers (102 miles) south of Mumbai. The fort is situated in the Arabian Sea, making it a notable example of coastal fortification.

Kolad River Rafting

Kolad, located in the Raigad district of Maharashtra, India, is renowned for its thrilling river rafting on the Kundalika River. The river, fed by water released from the Bhira Dam, provides an exciting and adventurous rafting experience with rapids ranging from Grade II to IV. Kolad's scenic landscape, combined with the adrenaline rush of rafting, makes it a popular destination for adventure enthusiasts and nature lovers.

Matheran

Matheran, a serene hill station in Maharashtra, India, is renowned for its vehicle-free environment, stunning viewpoints like Panorama Point and Echo Point, trekking trails, and the charming toy train ride. Ideal for nature lovers, it offers a peaceful retreat.

How to Reach

By Air

Lohegaon at Pune is the nearest airport to Raigad. The airport is well-connected to all the big cities in India including Chennai, Delhi, Goa, Kolkata, and Kochi. After reaching this airport from your initial destination, you can avail bus or taxi services to reach Raigad.

By Train

Nestled on the Konkan rail route, Vir Dasgaon is the nearest railway station to Raigad. One can board a regular train from either Mumbai or Pune. After reaching Vir Dasgaon, it is advisable to hire a taxi to conclude the remaining journey.

By Road

Situated at a distance of 32 Km, Murud is the nearest airport to Raigad. If you are heading here from Mumbai, it will take you around 3.5 hours to conclude your journey. Once you reach Murud, you can avail taxi services or board a private bus.
Scroll to Top