Buldhana
महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेला बुलढाणा जिल्हा! ह्या लहानशा जिल्ह्याला इतर जिल्ह्याच्या तुलनेत कधीकधी दुर्लक्षित केलं जातं. पण इतिहास,संस्कृती आणि निसर्ग सौंदर्याचा असा काही मिलाफ इथे आहे की जो आपल्याला येथे लगेच जाणवतो. बुलढाणा भेट देण्यासाठी नुसतं एक ठिकाणच नाही, तर ती महाराष्ट्राच्या विविध पैलूंचं दर्शन घडवणाऱ्या अद्भुत नगरीची सहल आहे.
बुलढाणा जिल्ह्याचा इतिहास
बुलढाणा या नावाचा उगम “भिल ठाणा” या शब्दांपासून झाला असावा असे मानले जाते. ज्याचा अर्थ भिल्ल या आदिवासीसमूहाचे घर असा होतो. पूर्वी बुलढाणा जिल्हा आणि बेरार प्रांत प्राचीन विदर्भ राज्याचा भाग होते ज्याचा उल्लेख महाभारतामध्ये सापडतो. या भूमीवर अनेक राजवटींनी राज्य केले जसे की मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादव!
१४व्या शतकात अलाउद्दीन खिलजीने हा प्रदेश जिंकून मुसलमान राजवटीची सुरुवात केली. यानंतर हा भाग बहमनी राजवटीत समाविष्ट झाला. १५७२ मध्ये तो निजामशाहीचा भाग बनला. १५९५ साली मुघल साम्राज्याने बेरारचा ताबा घेतला. मुघल साम्राज्याचं सामर्थ्य कमी झाल्यावर, १७२४ साली हैदराबादच्या निजाम असफजाह पहिला याने हा भाग आपल्या अखत्यारीत घेतला.
१८५३ साली ब्रिटिशांनी बुलढाण्याचा ताबा घेतला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने येथे प्रशासन सुरू केलं. १९०३ साली निजामाने हा भाग ब्रिटिशांना भाडेपट्टीवर दिला. १९५० साली बुलढाणा मध्य प्रदेशाचा भाग बनला आणि १९६० साली महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर हा जिल्हा महाराष्ट्रात समाविष्ट झाला.
बुलढाणा जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्हा अध्यात्म, नैसर्गिक सौंदर्य, आणि सांस्कृतिक वारशाचा संगम असलेल्या विविध पर्यटनस्थळांसाठी ओळखला जातो. येथे मंदिरे, वन्यजीव अभयारण्ये, मनोहारी निसर्गदृश्ये आणि ऐतिहासिक स्थळे पर्यटकांना अनुभवता येतात. धार्मिक यात्रा, निसर्गाच्या सान्निध्यात रमणं, किंवा इतिहासाचा मागोवा घेणाऱ्यांसाठी बुलढाणा जिल्हा एक उत्तम डेस्टिनेशन ठरतो.
- धार्मिक स्थळे
१. आनंद सागर, शेगाव: शेगावमधील आनंद सागर हा मानवनिर्मित तलाव आणि संकुल आहे. श्री गजानन महाराज संस्थानने पाणीटंचाई सोडवण्यासाठी आणि लोकांसाठी अध्यात्म व आनंदी परिसर तयार करण्यासाठी याची निर्मिती केली. माण नदीतून पाणी पंप करून तलाव भरला जातो. येथे शांत अध्यात्मिक वातावरण आणि थीम पार्कसारखे आनंददायी अनुभव मिळतात. यामधून मिळालेली कमाई स्थानिक पाणीपुरवठ्याच्या समस्यांवर खर्च केली जाते. येथे आकर्षक प्रवेशद्वार, सुंदर कारंजे आणि महाराष्ट्रातल्या संतांची ओळख करून देणारी एक गॅलरी तुम्हाला पाहायला मिळते. शिवाय भगवान शंकर, गणेश व नवग्रहांची मंदिरेही येथे तुम्ही पाहू शकता. - निसर्गरम्य स्थळे
१. लोणार सरोवर: बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे प्लायस्टोसीन युगात एका उल्कापातामुळे तयार झालेले अनोखे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. हे बेसाल्ट खडकांवर तयार झालेलं उच्च वेगाच्या उल्कापाताचं जगातील एकमेव विवर आहे. सरोवराचा व्यास सरासरी १.२ किमी आहे. सरोवराला खारट आणि अल्कधर्मी दोन्ही प्रकारच्या गुणधर्मांची जोड आहे. परिसरात गोड्या पाण्याचेही झरे आहेत. हे झरे धार, सीतनहिनी आणि रामगया नावाने ओळखले जातात. हे झरे आणि सरोवराजवळील मंदिरे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहेत. वर्षभर तुम्ही येथे भेट देऊ शकता पण उन्हाळ्यात अति उष्ण हवेमुळे मात्र इथे भेट देणे टाळा.
२. गिरडा: बुलढाण्यापासून १६ किमी अंतरावर असलेले गिरडा, अजिंठा पर्वतरांगेतील सुंदर टेकड्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे पांडवकालीन महादेव मंदिर आहे, ज्याचा संबंध अर्जुनाशी जोडला जातो. लोकांच्या मते, पांडवांच्या वनवासादरम्यान अर्जुनाने येथे पाच झरे निर्माण केले आणि त्यातील पाणी अजूनही गोमुखातून येत असल्याचे मानले जाते. धार्मिक महत्त्व आणि रमणीय निसर्गदृश्ये यामुळे गिरडा तुमच्या प्रवासामध्ये एक प्रमुख आकर्षण ठरू शकते.
३. ज्ञानगंगा अभयारण्य: बुलढाणा-खामगाव राज्यमार्गालगत असलेल्या २०५ चौ.किमी क्षेत्रफळाच्या या अभयारण्यात बोथी गावाचा समावेश आहे. विविध वनस्पती आणि प्राण्यांचा अधिवास जतन करणारे हे अभयारण्य निसर्गप्रेमी आणि वन्यजीवप्रेमींसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. हिवाळ्याच्या मोसमात तुम्ही इथे जंगल सफारी अनुभवू शकता.
४. अंबाबरवा अभयारण्य: संग्रामपूर तालुक्यातील १२७ चौ.किमी क्षेत्रफळ असलेले अंबाबरवा अभयारण्य सातपुडा पर्वतरांगांमध्ये आहे आणि मध्य प्रदेशाला लागून आहे. विविध वनस्पती व प्राण्यांसाठी ओळखले जाणारे हे अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील मुख्य वन्यजीव पर्यटनस्थळ आहे. येथील हिरवळ आणि समृद्ध जैवविविधतेमुळे हे ठिकाण तुम्हाला नक्की आवडेल.
बुलढाण्याला भेट देताना स्थानिक सण आणि महोत्सवांचा अनुभव घ्यायला विसरू नका. या मध्ये सहभागी होऊन तुम्ही या प्रदेशाची संस्कृती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल. तुमचा बुलढाणा दौरा तुम्हाला महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरांचे नव्याने दर्शन घडवेल आणि एक अविस्मरणीय अनुभव देईल.
भेट देण्यासाठी उत्तम काळ
बुलढाण्याचा प्रवास नियोजित करताना योग्य वेळ निवडणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणत्याही ऋतूत भेट दिली तरी बुलढाणा तुम्हाला अविस्मरणीय आठवणी देणारे अनेक अनुभव देईलच परंतु विशेषतः हिवाळा तुम्हाला आल्हाददायक वातावरणात फिरण्याची मजा देईल.
हंगाम | महिने | तापमान श्रेणी | ठळक वैशिष्ट्ये |
हिवाळा | ऑक्टोबर – फेब्रुवारी | 10°C – 30°C | आऊटडोअर उपक्रमांसाठी आदर्श हवामान, फुलांनी भरलेलं निसर्गसौंदर्य, सण आणि पर्यटनस्थळांची भेट |
पावसाळा | जून – सप्टेंबर | 20°C – 35°C | हिरवीगार नैसर्गिक दृश्यं, भव्य धबधबे, फोटोग्राफीसाठी मनोहारी वातावरण |
उन्हाळा | मार्च – मे | 25°C – 45°C | कमी गर्दी असलेली पर्यटनस्थळं, सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा भटकंतीसाठी उत्तम वेळ |
बुलढाणा जिल्ह्याला का भेट द्यावी?
बुलढाण्याला तुमच्या प्रवासाच्या यादीत सामावून घेण्याचं कारणं खूप आहेत. याठिकाणी याचा असलेला समृद्ध इतिहास, सांस्कृतिक वारसा, अप्रतिम निसर्गदृश्यं आणि चविष्ट खाद्यपदार्थ यामुळे तुमच्या प्रवासाच्या पुढच्या यादीमध्ये बुलढाणा जिल्ह्याला नक्की भेट द्या.
मंदिरापासून ते वन्यजीव अभयारण्यांपर्यंत प्रत्येकासाठी अनुभवण्यासारखे आणि पाहण्यासारखे इथे काही ना काही आहे. जरा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मागे असलेला बुलढाणा जिल्ह्यात प्रवास करताना तुम्हाला नक्की जाणवेल की इथे फक्त पाहण्याची ठिकाणंच नाहीत, तर महाराष्ट्राच्या गाभ्याशी तुम्हाला जोडणारा हा एक अनुभव आहे!
Travel Essentials
Here are the travel essentials one should know
Top Attractions
Discover the beauty and culture of Maharashtra through our curated experiences

Ambabarwa Sanctuary
The Ambabarwa Sanctuary is one of the lovelier scenic tourist spots in the Buldhana districts. One of the most famous sanctuaries in Buldhana districts is Ambabarwa Sanctuary. Ambabarwa Sanctuary is situated at Sangrampur, Buldhana. It lies in the Satpura hills. Here you can see many wild animals such as tigers, lions, cheetahs and other animals that live in wild.

Rajur Ghat
Rajur Ghat sits on the Buldhana Malkapur Road and has a natural scenic beauty. People travel from various states just to visit this ghat. Various temples, rivers, trees, and bushes can be seen in Rajur Ghat. The natural beauty of this ghat attracts tourists here. This area experiences fairly cold weather that draws tourists.

Dnyanganga Wildlife Sanctuary
There are different natural tourist attraction sites in the towns of Buldhana as well as sanctuaries. One of the largest sanctuaries is the Dnyanganga Wildlife Sanctuary which is often visited by tourists in the cities of Buldhana. This sanctuary is visited by thousands of tourists annually. It is one of the favourite places in the Buldhana district for people who love nature.

Gajanan Maharaj Temple
The township of Buldhana has quite many popular tourist sites, including one that is referred to as the Gajanan Maharaj Temple, a temple for religious visitors. People who are devoted to Gajanan Maharaj temple include those from the region of Buldhana and also visitors from all around Maharashtra that come for darshan.

Anand Sagar
As a result of scarcity in Shegaon village area for leaves a project done by Shri Gajanan Maharaj Sansthan Shegaon in creating lake full of water. Anand Sagar is an eco-tourism spot situated at Shegaon, Buldhana. Shegaon village is some three km from Anand Sagar.

Lonar Sarovar
Knowing About Lonar Sarovar. You also learn about Lonar lake in secondary schools. Visit Buldhana district to see it for real purpose to view this lake. Lonar Sarovar is also perceived as a saltwater lake located in the Buldhana district. This lake is formed by a meteorite and lakhs of tourists come to view this place annually.

Lord Hanuman
Buldhana district are various religious tourism sites. In the Buldhana district, the Hanuman idol is one of the important religious tourist places. In the Buldhana district, there is a Hanuman idol at Nandura. In here, there is a statue of Lord Hanuman with the height of 105 feet. This idol attracts a lot of local tourists and foreign tourists to the Buldhana district.

Renuka Devi Temple
As well as religious tourism in Buldhana districts, there is also natural tourism. Buldhana district is one of the religious tourist spots with Renuka Devi Temple as a key religious place. A temple of Renuka Devi exists at Chikhali in the Buldhana district. This is another important site where devotees of Renu Devi gather for darshan.

Sailani Baba Dargah
Buldhana district are various religious tourism sites. In the Buldhana district, the Hanuman idol is one of the important religious tourist places. In the Buldhana district, there is a Hanuman idol at Nandura. In here, there is a statue of Lord Hanuman with the height of 105 feet. This idol attracts a lot of local tourists and foreign tourists to the Buldhana district.

Sindkhed Raja
Rajamata Jijau, i.e., Matoshree Chhatrapati Shivaji Maharaj, was born on January 12, 1598. Sindkhed, in the Buldhana district, is the birthplace of Rajmata Jijau. This is a must-visit place for history lovers. It is one of the major tourist attractions in the district of Buldhana. Bhuikot palace is the place where Rajmata Jijau was born.