Palghar

[atlasvoice]

पालघर हे महाराष्ट्राच्या कोकण विभागातील एक महत्त्वाचे शहर असून ते मुंबई महानगर प्रदेशाचा भाग आहे. २०१४ पासून नव्याने स्थापन झालेल्या पालघर जिल्ह्याचे मुख्यालय म्हणून याची ओळख आहे. हे शहर मुंबई-अहमदाबाद रेल्वे मार्गावर महत्त्वाचा दुवा साधते आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रमुख स्थानकांपैकी एक आहे.

पालघर जिल्ह्यात अनेक पारंपरिक जमाती व समुदाय राहतात. त्यामध्ये कुणबी, मांगेला, वैती, मच्छीमार, भंडारी, वारली (आदिवासी), कातकरी, मल्हार कोळी, वंजारी, वाडवळ आणि माळी (सोरठी) यांचा समावेश आहे. यामधून वारली समाज जगभरात प्रसिद्ध आहे, विशेषतः त्यांच्या वारली चित्रकलेसाठी. ही चित्रकला हजारो वर्षे जुन्या परंपरेचा भाग असून ती आजही जागतिक स्तरावर ओळखली जाते. याशिवाय तारपा नृत्य हे वारली समाजाचे सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे. जे पारंपरिक उत्सवांमध्ये आनंदाने साजरे केले जाते.

पालघर जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये मच्छीमारी (मत्स्य व्यवसाय) हा एक महत्त्वाचा घटक आहे. किनारपट्टीवरील समाजांसाठी तो केवळ व्यवसाय नाही तर संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. येथील स्थानिक रहिवासी निसर्गाशी जोडलेल्या पारंपरिक व्यवसायांत गुंतलेले असून जिल्ह्याची अर्थव्यवस्था भौगोलिक स्थान आणि सांस्कृतिक परंपरांवर आधारलेली आहे.

इतिहास, संस्कृती आणि आधुनिक विकास यांचा सुंदर संगम असलेला पालघर हा प्रशासकीय आणि सांस्कृतिक महत्त्व असलेला जिल्हा आहे. जो आपल्या परंपरा जपत सतत प्रगती करत आहे.

पालघर जिल्ह्याचा इतिहास

वसई तालुक्याचा इतिहास विशेषतः पोर्तुगीज राजवटीशी जोडलेला आहे. दीर्घ काळ पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली असलेल्या वसईवर अखेर मराठ्यांनी १७३९ मध्ये विजय मिळवला. पेशव्यांचे सेनानी चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी वसई किल्ला जिंकून त्यावर भगवा ध्वज फडकवला आणि पोर्तुगीज सत्तेचा शेवट केला.

१९४२ च्या ‘चलेजाव’ आंदोलनात’ पालघरने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ब्रिटिश अत्याचारांविरोधात लढताना पाच क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या सन्मानार्थ पालघर शहरात ‘पंच बत्ती स्मारक’ उभारण्यात आले आहे.त्याआधी, १९३० च्या मिठाचा सत्याग्रह आंदोलनातही पालघरच्या लोकांनी सक्रिय सहभाग घेतला. वडराई ते सातपाटी या परिसरातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी इंग्रजांविरोधात लढा उभारला. सातपाटी गावात विदेशी वस्तूंवर संपूर्ण बहिष्कार टाकून त्या नष्ट केल्या गेल्या.

१ ऑगस्ट २०१४ रोजी महाराष्ट्र शासनाने पालघरला स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित केले आणि तो महाराष्ट्राचा ३६ वा जिल्हा बनला. पूर्वी हा भाग ठाणे जिल्ह्यात समाविष्ट होता पण पालघर, वसई आणि जव्हार या तालुक्यांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वामुळे त्याला स्वतंत्र जिल्हा म्हणून मान्यता देण्यात आली.

पालघर जिल्हा इतिहास, परंपरा आणि स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाने समृद्ध आहे आणि त्याचे शौर्य आजही प्रेरणादायी ठरते.

पालघरमधील पर्यटन स्थळे

  • धार्मिक स्थळे
    १. माँ जीवदानी मंदिर (विरार): जीवदानी टेकडीवर वसलेले हे मंदिर देवी जीवदानीला समर्पित असून ती एक जागृत देवी मानली जाते. हे मंदिर १३७५ पायऱ्या चढून गाठावे लागते. सुमारे १५० वर्षांपूर्वी उभारलेले हे मंदिर हजारो भाविकांना विशेषतः रविवारी आणि सणासुदीच्या काळात आकर्षित करते. टेकडीच्या पायथ्याशी असलेला पापडखंडी धरण एकेकाळी येथील पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत होते.
    २. महालक्ष्मी मंदिर (डहाणू): डहाणू येथे असलेले महालक्ष्मी मंदिर आदिवासी समाजाच्या कुलदैवतापैकी एक मानले जाते. येथे साजऱ्या केल्या जाणाऱ्या महालक्ष्मी यात्रा (१५ दिवसांचा उत्सव) आणि तारपा नृत्य यामुळे हे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. हा उत्सव हनुमान जयंतीच्या दिवशी सुरू होतो आणि हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.
  • समुद्रकिनारे
    १. केळवा बीच: मुंबईच्या जवळ असलेला केळवा बीच एक सुंदर,स्वच्छ आणि निवांत समुद्रकिनारा आहे. सुमारे ८ कि.मी.लांब पसरलेला हा किनारा गर्दीपासून दूर असून खासगी वेळ घालवू इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी उत्तम पर्याय आहे.
    २. डहाणू-बोर्डी बीच: १७ किमी लांब हा समुद्रकिनारा निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील चिकू बागायती आणि झोरोस्टीयन मंदिर हे या भागाचे खास वैशिष्ट्य आहे. हे मंदिर १००० वर्षांपासून अखंड प्रज्वलित असलेल्या पवित्र अग्नीसाठी ओळखले जाते त्यामुळे या ठिकाणाला धार्मिक महत्त्वही आहे.
    ३. सुरुची बीच (वसई): वसई नगरात असलेला हा समुद्रकिनारा स्वच्छ आणि पर्यावरणपूरक आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी सकाळच्या सूर्योदयापासून ते संध्याकाळच्या सुर्यास्तापर्यंत मनमोहक दृश्येबघायला मिळतात. प्राकृतिक सौंदर्यासह शांतता शोधणाऱ्यांसाठी हे आदर्श ठिकाण आहे.
    ४. आळेवाडी बीच (बोईसर): बोईसर औद्योगिक क्षेत्राच्या जवळ असलेला आळेवाडी बीच सरकारच्या प्रयत्नांमुळे पर्यटकांमध्ये लोकप्रिय होत आहे. येथे घोडेस्वारी, घोडागाडी फेरी, उत्तम जेवण, परवडणारी हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स अशा सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे हा किनारा कुटुंब आणि मित्रांसोबत आरामशीर वेळ घालवण्यासाठी उत्कृष्ट पर्याय आहे.
  • किल्ले
    पालघर जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत, जे भूतकाळातील विविध राजवटींच्या संघर्षाचे आणि पराक्रमाचे साक्षीदार आहेत.
    १. अर्नाळा किल्ला (जंजिरे अर्नाळा): “जलदुर्ग” म्हणून ओळखला जाणारा अर्नाळा किल्ला पाण्याने वेढलेला असून मराठे, मुघल, पोर्तुगीज आणि पेशवे यांच्या सत्तेखाली राहिलेला आहे. १५१६ मध्ये महमूद बेगडाने बांधलेला हा किल्ला धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. येथे त्र्यंबकेश्वर, भवानी माता, कालीका माता आणि महादेवाची मंदिरे आहेत.
    २. वसई किल्ला: उत्तर भारतातील पोर्तुगीज सत्तेचे प्रमुख ठाणे म्हणून वसई किल्ल्याने ऐतिहासिक महत्त्व मिळवले. हा किल्ला ४.५ किमी लांब आणि ११ बुरुजांनी युक्त आहे. १८०२ चा बासेन करार (Treaty of Bassein) याच किल्ल्यात झाला. ज्याने मराठा साम्राज्यावर मोठा प्रभाव टाकला.
    ३. गंभीरगड: गुजरात सीमेजवळ वसलेला गंभीरगड किल्ला नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो. जरी येथील तटबंदी फारशी मजबूत नसली तरी येथून महालक्ष्मी शिखर, अशेरी आणि अडसूळ किल्ल्यांचे विहंगम दृश्य दिसते. ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाण आहे.
    ४. तारापूर किल्ला: हा किल्ला सध्या चोरगे कुटुंबाच्या ताब्यात आहे. एकेकाळी पेशव्यांनी विकाजी मेहरजी यांना हा किल्ला बहाल केला होता. येथे पाण्याची विहीर, बाग आणि चर्च तसेच मठाचे अवशेष पाहायला मिळतात. पेशव्यांच्या काळात चिमाजी आप्पांनी हा किल्ला यशस्वीरित्या जिंकला होता.
    ५. काळदुर्ग: १५५० फूट उंचीवर असलेला काळदुर्ग हा गड आयताकृती स्वरूपाचा असून तो दाट जंगलांनी वेढलेला आहे.गडाचे दोन भाग आहेत. एक आयताकृती खडकावर आणि दुसरा खाली! येथे आदिवासी समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. त्यामुळे त्याचे सांस्कृतिक महत्त्व अधिक आहे.
    ६. केळवा किल्ला: पोर्तुगीजांनी बांधलेला हा किल्ला केळवा तलावाजवळ असून छत्रपती शिवाजी महाराजांनी याचा उपयोग लष्करी रणनीतीसाठी केला होता.चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला हा किल्ला निसर्गप्रेमी आणि इतिहासप्रेमींसाठी उत्कृष्ट ठिकाण आहे.
    ७. कामनदुर्ग: वसईतील कामनदुर्ग किल्ला गाठणे खूपच आव्हानात्मक आहे. येथे पोहोचण्यासाठी चार पाण्याच्या प्रवाहांमधून जावे लागते त्यातील तिसरा प्रवाह तब्बल ४० फूट रुंद आहे. येथे पाच जुन्या गुहा असून आजही येथे वारली आदिवासी समाज वास्तव्यास आहे.
    ८. शिरगाव किल्ला: शिरगाव किल्ला हा एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीतीसाठी महत्त्वाचा गड होता. नंतर पोर्तुगीजांनी या किल्ल्याचा विस्तार केला आणि त्याच्या मूळ विटांच्या लाल दगडी रचनेला जपून नवी मजबुती दिली. आज हा किल्ला भग्न अवस्थेत असला तरी त्याच्या भिंतींमध्ये गूढ गुहा आणि दुर्मीळ बहुप्रशाखी ताडाचे झाड लपलेले आहे जे त्याच्या गूढ आणि ऐतिहासिक सौंदर्यात भर घालते. इतिहासप्रेमी आणि साहस शौकिनांसाठी हा किल्ला आजही एक अद्भुत आकर्षण आहे!
  • अन्य आकर्षणे
    १. जव्हार राजवाडा: जव्हार हा एक सुंदर हिल स्टेशन आहे. ज्याला “पालघर जिल्ह्याचे महाबळेश्वर” असेही म्हटले जाते. येथे दाट जंगल, आल्हाददायक वातावरण आणि प्राचीन वारली चित्रकला पाहायला मिळते. पावसाळ्यात संपूर्ण परिसर दाट धुक्याने वेढलेला असतो त्यामुळे येथे एक अद्भुत आणि जादूई अनुभव मिळतो. येथे आदिवासी जीवनशैली जवळून अनुभवता येतो. त्यामुळे तो एक वेगळाच आनंद देतो.
    २. काळमंदवी धबधबा: पालघर जिल्ह्यातील काळमंदवी धबधबा अजूनही तुलनेने कमी प्रसिद्ध असला तरी निसर्गसौंदर्याने नटलेलाआहे. १०० मीटर उंचीवरून कोसळणारा हा बहुस्तरीय धबधबा दाट जंगल आणि खडकाळ भूप्रदेशाने वेढलेला आहे.
    साहसी पर्यटकांसाठी येथे ट्रेकिंग, स्विमिंग, क्लिफ जंपिंग, रॉक क्लाइंबिंग आणि रॅपलिंग यांसारख्या रोमांचक ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज उपलब्ध आहेत. मुंबईच्या जवळ असल्याने अनेक पर्यटक येथे भेट देतात.
    पालघर जिल्हा हा फक्त युद्धाच्या इतिहासासाठीच प्रसिद्ध नाही, तर त्याच्या समृद्ध आदिवासी संस्कृतीसाठीही ओळखला जातो. विशेषतः जव्हारमध्ये, जिथे वारली पेंटिंग्स आदिवासी कलात्मक परंपरांचा उलगडा करतात. वारली, कातकरी, मल्हार मच्छिमार आणि इतर आदिवासी जमाती या भागात मुख्यतः वसलेल्या आहेत आणि त्यांना त्यांच्या सांस्कृतिक वारशाबद्दल आदर आहे. वारली कला आणि तारपा नृत्य या त्यांच्या सामाजिक ओळखीचे प्रतीक आहे.
  • वारली कला
    वारली कला प्राचीन काळापासून जपली गेली आहे. ११०० वर्षांहून अधिक जुन्या चित्रकले मध्ये वारली कलेचा समावेश होतो. या कलात्मक परंपरेत आदिवासींच्या सवयी, दैनंदिन क्रिया, आणि जीवनातील महत्त्वाच्या घटना यांचे चित्रण केले जाते. विवाह, नृत्य, आणि निसर्गाच्या अद्भुत गोष्टींना अतिशय सुंदरपणे दर्शवल्या जातात. या चित्रकलेसाठी रासायनिक रंगांचा वापर न करता इको-फ्रेंडली साहित्यांचा वापर केला जातो. माती, तांदळाचे पीठ, वनस्पतींचे रंग, आणि बाम्बूचा ब्रश अश्या साहित्याचा वापर करून ही चित्रे तयार होतात. या चित्रकलेत आदिवासी लोकांच्या जीवनशैलीचे आकर्षक चित्रण केले जाते आणि ती भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय झाली आहे.

भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ

ऋतू कालावधी मुख्य वैशिष्ट्ये उपक्रम
हिवाळा ऑक्टोबर – मार्च आल्हाददायक हवामान, थंडगार वातावरण आणि कमी आर्द्रता किल्ले, मंदिरे आणि समुद्रकिनारे पाहण्यासाठी सर्वोत्तम वेळ
पावसाळा जून – सप्टेंबर हिरवाईने नटलेले निसर्गरम्य दृश्य, पण जोरदार पाऊस प्रवासात अडथळा आणू शकतो निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग, पण प्रवास करताना काळजी घेणे गरजेचे
उन्हाळा एप्रिल – मे तुलनेने उष्ण हवामान आणि कमी गर्दी उष्मा जास्त पण गर्दी कमी असल्यामुळे निवांत फिरता येते

पालघर जिल्ह्याला का भेट द्यावी?

महाराष्ट्रातील पालघर हे एक अद्वितीय आणि कमी प्रसिद्ध ठिकाण आहे, जिथे इतिहास, संस्कृती आणि निसर्ग यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो. तुम्ही साहसप्रेमी, इतिहासप्रेमी किंवा पारंपरिक आदिवासी जीवनशैलीचा अनुभव घेऊ इच्छिणारे असाल तर पालघरमध्ये तुमच्यासाठी काही ना काही खास नक्कीच आहे. प्राचीन किल्ले, शांत समुद्रकिनारे,पवित्र मंदिरे आणि जागतिक ख्यातीप्राप्त वारली कला यामुळे पालघर हे एक अनमोल ठिकाण ठरते.

पालघरची खरी ओळख त्याच्या मूळ आदिवासी संस्कृतीमध्ये आहे. वारली समाजाची पारंपरिक चित्रशैली आणि नृत्य ही येथील सांस्कृतिक ठेवा जपणारी महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. वारली चित्रकला जी पूर्णतःनैसर्गिक रंगांपासून रेखाटली जाते ही गाव जीवनाच्या कथा सांगणारी कला संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे.

तुम्ही इतिहास, अध्यात्म, साहस किंवा सांस्कृतिक समृद्धी यांपैकी कोणत्याही गोष्टीत रस घेत असाल तर पालघर तुमच्या प्रवासाच्या यादीत असायलाच हवे!

Travel Essentials

Here are the travel essentials one should know

Weather

29 - 41°C

Ideal Duration

1 - 3 days

Best Time

November to Febuary

Planning a Trip?

Know how to reach

Top Attractions

Discover the beauty and culture of Maharashtra through our curated experiences

Kelva Beach

A serene beach known for its golden sands and tranquil ambiance, ideal for relaxation and water sports.

Shirgaon Fort

An ancient fort with historical significance, offering panoramic views of the surrounding landscape.

Vasai Fort

A historic fort built by the Portuguese in the 16th century, featuring intricate architecture and stunning views of the Arabian Sea.

Kaldurg Fort

An ancient hill fort known for its trekking trails and panoramic views of the surrounding hills and valleys.

Jivdani Temple

Maa Jivdani temple is located on the Jivdani hill in Virar. it is the most significant landmark in Virar located on the mountain. it is famous throughout the country for its only temple of Goddess Jivdani which is located around 1375 steps above the ground level, atop a hill in the eastern part of the city.

Hiradpada Waterfall

Hiradpada is one of the 109 villages in Jawhar. The village is famous for its waterfall, which is just 0.5 km away from the village. The village has also gained popularity for the native tribals’ unique Dhol dance, Tarpa dance and Warli painting.

Kalmandavi Waterfall

The fascinating Kalmandvi Waterfall lies about 8km south of Jawhar town. It’s a beautifully cascading 100-meter-deep waterfall. Its rocky area makes for a perfect spot for adventure sports such as Trekking, Rock Climbing and Rappelling. A miraculous quality of this enthralling fall is that it flows throughout the year.

Hanuman Point

An ancient Hanuman mandir of great religious importance gives it its name, Hanuman Point. Another point that lures tourists is the astonishing view of Jaivilas Palace. The Maruti or Hanuman mandir is known as Katya Maruti mandir. During the day, the historical fort of Shahapur Maholi is visible from this point. A beautiful green 500ft deep valley known as Devkobacha Kada unfailingly takes the attention of the tourists.

How to Reach

By Air

Palghar doesn’t have its own airport. The closest one is Chhatrapati Shivaji Maharaj International Airport (BOM) in Mumbai. From there, you can travel to Palghar by road or train.

By Train

Distance: 47.5 mi Duration: 1h 36m What companies run services between Mumbai, India and Palghar, India? Mumbai Suburban Railway operates a train from Bandra to Palghar every 4 hours. Tickets cost $1 and the journey takes 1h 36m. Indian Railways also services this route 4 times a day.

By Road

From Mumbai or nearby areas, take National Highway 48 (NH48) or the Western Express Highway (WEH) towards Palghar. Drive or take a bus to Palghar, which is approximately 120 kilometers away from Mumbai. Palghar is well-connected by road, offering a smooth journey with various transportation options available.
Scroll to Top