Nanded

[atlasvoice]

महाराष्ट्राच्या दक्षिण-पूर्व भागात वसलेले नांदेड हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. गोदावरी नदीच्या काठावर वसलेले हे शहर मराठवाड्याचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. नांदेडचे “गुरुद्वारा हजूर साहिब” यामुळे अमृतसरनंतर सर्वात मोठे शीख तीर्थस्थान म्हणून ओळखले जाते. शहरातील ऐतिहासिक वास्तू समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवतात. तसेच गोदावरी नदीच्या सान्निध्यामुळे येथील निसर्ग सौंदर्य अधिक खुलून दिसते.

शिक्षणाच्या दृष्टीनेही नांदेड महत्त्वपूर्ण आहे. येथील शैक्षणिक संस्था गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उच्च शिक्षणाच्या उत्तम संधी उपलब्ध करून देतात. नांदेड इतिहास आणि आधुनिकतेचा सुरेख संगम असलेले शहर आहे. जिथे प्रवासी परंपरेची जपणूक आणि प्रगती यांचा अद्वितीय मिलाफ दिसून येतो.

शहरातील धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळेही विशेष प्रसिद्ध आहेत.माहूरमधील रेणुका देवी मंदिर (साडेतीन शक्तीपीठांपैकी एक), माहूरगड किल्ला आणि कंधार किल्ला हे त्यापैकी काही महत्त्वाचे स्थळे आहेत. तसेच, केदारगुडा मंदिर आणि गायतोंड येथील प्राचीन शिवमंदिर हे नांदेडच्या आध्यात्मिक वारशात भर घालतात.

इतिहास आणि धार्मिक महत्त्व यासोबतच नांदेड हे आता एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणूनही विकसित झाले आहे. येथे प्रामुख्याने कृषी आणि स्टील फर्निचर उत्पादनाशी संबंधित उद्योग मोठ्या प्रमाणावर विकसित झाले आहेत. येथील सांस्कृतिक विविधता देखील लक्षणीय आहे.जिथे मराठी, उर्दू, हिंदी, लांबाडी आणि तेलुगू या भाषा मोठ्या प्रमाणावर बोलल्या जातात.

नांदेडचा इतिहास

महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील प्राचीन शहर नांदेड हे समृद्ध आणि वैविध्यपूर्ण इतिहासाने भरलेले आहे. चौथ्या आणि पाचव्या शतकात हे शहर नंद वंशाच्या अधिपत्याखाली होते तर नंतर सम्राट अशोकाच्या काळात मौर्य साम्राज्यात समाविष्ट झाले. महिंभट्ट यांनी लिहिलेल्या ७०० वर्षे जुन्या “लिलाचरित्र” ग्रंथात नांदेडचा उल्लेख आढळतो. विशेषतः तेथील प्राचीन सिंचन व्यवस्थेचे वर्णन यात केले आहे जे या शहराच्या त्याकाळातील स्थापत्यशास्त्राच्या महत्त्वाला अधोरेखित करते.

“नांदेड” या नावाच्या उगमाबद्दल विविध दंतकथा प्रचलित आहेत.असे मानले जाते की “नंदी तत” या नावावरून नांदेड हे नाव पडले आहे. येथे भगवान शिवाचे वाहन असलेल्या नंदीने गोदावरी काठावर तपस्या केली होती. दुसऱ्या दंतकथेनुसार येथे नऊ ऋषी “नंद” ध्यानधारणा करत असत म्हणून या स्थळाला “नांदेड” असे नाव मिळाले. तिसऱ्या मतानुसार नांदेड हे मगध साम्राज्यातील नऊ नंद राज्याच्या सीमेवर वसलेले होते यावरून त्याचे नाव नांदेड पडले असावे.

१७व्या शतकात औरंगजेबाच्या काळात नांदेड तेलंगणाच्या राजधानीच्या रूपात विकसित झाले. मात्र १७०८ साली दहावे शीख गुरु, गुरु गोविंद सिंगजी यांनी हे स्थळ आपला कायमचा निवासस्थान म्हणून निवडले. येथेच त्यांनी गुरु ग्रंथ साहिब हे शिख धर्माचे अंतिम आणि शाश्वत गुरु म्हणून घोषित केले. यामुळे नांदेड शिख धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र स्थळ बनले. गुरु गोविंद सिंगजी यांच्या समाधी स्थळावर प्रसिद्ध “गुरुद्वारा हजूर साहिब” बांधण्यात आली, जी आजही शीख समुदायासाठी श्रद्धेचे केंद्र आहे. नांदेड हे अमृतसरनंतर शिख धर्मीयांसाठी दुसऱ्या क्रमांकाचे पवित्र शहर मानले जाते.

१७२५ मध्ये नांदेड हैदराबाद संस्थानाचा भाग बनले आणि निजामाच्या अधिपत्याखाली गेले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही नांदेडने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील हैदराबाद मुक्ती संग्रामात नांदेड हे केंद्रबिंदू होते. स्वातंत्र्यानंतर, हैदराबाद संस्थानावर झालेल्या पोलीस कारवाईनंतर नांदेड भारतात समाविष्ट झाले. पुढे बॉम्बे राज्याचा भाग झाल्यानंतर महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर हा जिल्हा महाराष्ट्रात समाविष्ट झाला.

इतिहास,धार्मिक महत्त्व आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदान यामुळे नांदेडचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशात एक महत्त्वाचे स्थान आहे. शतकानुशतके हे शहर विविध राजवटींचे, धार्मीक चळवळींचे आणि ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार राहिले आहे त्यामुळे आजही ते प्रवाशांसाठी आणि अभ्यासकांसाठी एक महत्त्वपूर्ण डेस्टिनेशन आहे.

नांदेडमधील पर्यटन स्थळे

  • धार्मिक स्थळे
    १. रेणुका देवी मंदिर, माहूर : माहूर हे तीर्थयात्रेचे एक पवित्र स्थळ असून साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म्हणून प्रसिद्ध असलेले रेणुका देवी मंदिर येथे स्थित आहे. सुमारे ९०० वर्षांपूर्वी देवगिरीच्या यादव राजाने हे मंदिर बांधले. नैसर्गिक सौंदर्याच्या सान्निध्यात वसलेले हे मंदिर धार्मिक श्रद्धाळू आणि निसर्ग प्रेमींसाठी विशेष आकर्षण आहे.
    २. श्री सिद्धेश्वर मंदिर: दिग्लूर तालुक्यातील हट्टल येथे वसलेले हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. चालुक्य कालखंडात संपूर्ण दगडात कोरलेले हे मंदिर स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे.
    ३. तख्त श्री हजूर साहिब गुरुद्वारा: हे शिख धर्मातील पाच तख्तांपैकी एक असलेले पवित्र स्थळ आहे. गुरु गोविंद सिंहजी यांनी येथे आपले शेवटचे दिवस व्यतीत केले होते, त्यामुळे हे स्थळ शिख धर्मीयांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. गुरुद्वाऱ्याची भव्य वास्तुकला आणि शांत वातावरण हे भाविकांसह पर्यटकांनाही मोहवते.
    ४. बिलोलीची मशीद: ही मशिद सुमारे ३३० वर्षांपूर्वी औरंगजेबाच्या सैन्यातील सर्फराज खान यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आली होती. संपूर्ण दगडी बांधकाम आणि अद्वितीय घंटाकृती रचना यामुळे ही मशीद विशेष महत्त्वाची आहे. उत्तरेस आणि दक्षिणेस असलेल्या उंच मिनारांमुळे तिचे सौंदर्य अधिकच उठून दिसते.
  • किल्ले
    १. नांदेड किल्ला: रेल्वे स्थानकापासून सुमारे ४ किमी अंतरावर असलेला नांदेड किल्ला तीन बाजूंनी गोदावरी नदीने वेढलेला आहे. हिरवाईने नटलेला हा किल्ला नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक महत्त्व यांचे अनोखे मिश्रण सादर करतो. किल्ल्याच्या आत एक सुंदर बागही आहे जी पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरते.
    २. कंधार किल्ला: राष्ट्रकूट वंशाच्या कृष्ण राजा तृतीय याने बांधलेला हा किल्ला नांदेडच्या मध्यभागी स्थित आहे. या किल्ल्यावरील घुमटांमध्ये अहमदनगरकालीन स्थापत्यशैलीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो.

नांदेड हे समृद्ध ऐतिहासिक, धार्मिक आणि स्थापत्य वारशाने भरलेले शहर आहे. त्यामुळे तीर्थयात्री, इतिहासप्रेमी आणि पर्यटकांसाठी नांदेड हे अनोखे डेस्टिनेशन ठरते.

भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ

नांदेडचा प्रवास सुखद आणि संस्मरणीय करण्यासाठी योग्य वेळ निवडणे महत्त्वाचे आहे. नोव्हेंबर ते मार्च हा काळ नांदेडला भेट देण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो कारण या काळात हवामान आल्हाददायक आणि निसर्गाची हिरवाई मनमोहक असते.

नांदेडला भेट देण्याचा सर्वोत्तम वेळ आदर्श महिने हवामानाची स्थिती शिफारस
सर्वोत्तम वेळ नोव्हेंबर ते मार्च सुखद हवामान, हिरवेगार निसर्ग पर्यटन आणि आऊटडोअर ऍक्टिव्हिटीजसाठी आदर्श

नांदेड जिल्ह्याला का भेट द्यावी?

नांदेड केवळ धार्मिक स्थळांसाठीच प्रसिद्ध नाही तर त्याच्या समृद्ध ऐतिहासिक वारशामुळेही महत्त्वाचे ठरते. नंद वंश आणि मौर्य साम्राज्याशी असलेले जुने संबंध तसेच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील नांदेडचे योगदान हे या शहराला ऐतिहासिक दृष्टिकोनातून आणखी खास बनवते. प्राचीन नांदेड किल्ला, भव्य कंधार किल्ला आणि श्रद्धास्थान असलेली माहूरचे रेणुका देवीचे मंदिर हे नांदेडच्या गौरवशाली भूतकाळाचे दर्शन घडवते.

आध्यात्मिक आणि ऐतिहासिक अनुभूतीसाठी नांदेड हे एक आदर्श पर्यटनस्थळ आहे. तुम्ही इतिहासप्रेमी असाल, धार्मिक प्रवासी असाल किंवा निसर्गप्रेमी असाल तरीही नांदेडची सांस्कृतिक, वास्तुशिल्पीय आणि निसर्गरम्य ठिकाणे तुम्हाला नक्कीच मंत्रमुग्ध करतील!

Travel Essentials

Here are the travel essentials one should know

Weather

31 - 42°C

Ideal Duration

1 - 2 days

Best Time

November to February

Top Attractions

Discover the beauty and culture of Maharashtra through our curated experiences

Malegaon Yatra

Malegaon is situated in Loha Taluka. The village is famous for a very big fair held in honour of Lord Khandoba

Mahur Gadh

A pilgrim Centre of great significance. It is considered to be one of the Shaktipith of Maharashtra.

Sachkhand Gurudwara of Nanded

Takhat Sachkhand Shri Hazur Abchalnagar Sahib is the main Gurudwara of Nanded and is one of the five High seats of Authority of the sikhs

Hottal

"Hottal" is famous as the village that holds historical heritage in the Nanded district and was the sub-principality of the Chalukyas.

How to Reach

By Air

Shri Guru Gobind Singh Ji Airport is available in Nanded.

By Train

Huzur Sahib Nanded Railway station On South Centre Railway.

By Road

Nanded bus stand, Nanded is situated on road no. NH222.
Scroll to Top