Beed
महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेला बीड जिल्हा अनेक प्रवाशांच्या नजरेतुन सुटतो पण बीडमधील तुमचा प्रवास सुरू होताच तुम्हाला इतिहास, मनमोहक निसर्गदृश्ये आणि संस्कृती यांचा अनोखा संगम पाहायला मिळेल.
हा जिल्हा विविध भौगोलिक वैशिष्ट्यांसाठी ओळखला जातो. हिरवीगार शेती ते खडकाळ टेकड्यांमुळे निसर्गप्रेमींसाठी हे एक आदर्श ठिकाण आहे. तुमच्या प्रवासात तुम्हाला छोटी खेडी, प्राचीन मंदिरे आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या निसर्गसौंदर्याने नटलेली दृष्ये यांचा तुम्हाला नक्कीच अनुभव घेता येईल.
बीडचा समृद्ध इतिहास
फारच पुरातन अश्या संस्कृतींनी या भागावर आपला ठसा उमटवला आहे. मध्ययुगीन दख्खन राजवटींनी कधीकाळी या महत्त्वाच्या केंद्रावर राज्य केलं होतं. आजही इथल्या प्राचीन इमारतींमध्ये आणि ऐतिहासिक ठिकाणांमध्ये त्या गौरवशाली काळाची चिन्हे दिसून येतात.
बीडचा इतिहास ११७३ सालापासून ओळखला जातो जेव्हा बीड यादवांच्या राज्याधिकाराखाली होते. यादवांचा राजधानी देवगिरी (आत्ताचा दौलताबाद) म्हणून ओळखला जातो, तेथे होती. बीडबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. एक कथा सांगते की बीड पांडव आणि कौरवांच्या काळात ‘दुर्गावती’ म्हणून ओळखले जात होते. त्यानंतर, राजा विक्रमादित्यने हे शहर जिंकून त्याची बहीण चंपावतीच्या नावावरून ‘चंपावतिनगर’ असे नाव ठेवले.
१६०० ते १८५८ च्या दरम्यान, बीड अनेक शासकांच्या हाती गेला आणि पुन्हा ताब्यात घेतला गेला. निझामशाही आणि अडिलशाही यांच्या दरम्यान सतत संघर्ष होता. बीड मराठवाड्याचा भाग असताना, १८१८ मध्ये धर्मजी प्रतापराव यांच्या नेतृत्वाखाली पहिली स्वातंत्र्याची लढाई झाली. यानंतर १८५८ मध्ये एक मोठा बंड झाला, पण तोही अपयशी ठरला आणि सर्व बंडखोर पकडले गेले. १८९८ मध्ये राव साहेब यांच्या नेतृत्वाखाली बीडच्या ब्राह्मणांनी एक मोठं बंड केले, पण ब्रिटिश सरकारने तेही दडपले.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९४७ मध्ये बीड हैदराबाद राज्याचा भाग होता. १९४८ मध्ये हैदराबाद भारतात समाविष्ट झाल्यानंतर, या कालावधीत अनेक धार्मिक दंगली, अपहरण, हत्यां आणि पवित्र स्थळांची अवहेलना झाली. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर बीडची पुनर्रचना केली गेली. १९६२ मध्ये बीड अखेर बॉम्बे प्रेसीडन्सीचा भाग बनला.
बीडमधील पर्यटन स्थळे
बीड जिल्हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा असलेला जिल्हा आहे. इथली मंदिरे आणि स्मारके, श्रद्धा आणि सांस्कृतिक इतिहासाचा सुंदर संगम दाखवतात. बीडमधील काही प्रमुख मंदिरे आणि पर्यटन स्थळांचा आढावा:
- धार्मिक स्थळे
१. माणकेश्वर मंदिर:हे मंदिर भगवान शंकराचे मंदीर आध्यात्मिक ठिकाण तर आहेच, पण प्राचीन वास्तुकलेचं अप्रतिम उदाहरणही आहे. मंदिरातील नक्षीकाम आणि शिल्पं पर्यटकांना भुरळ घालतात. या ठिकाणी भेट देताना तुम्हाला बीडच्या समृद्ध आध्यात्मिक वारशाचा अनुभव मिळेल. एखाद्यावेळेस स्थानिक पूजाविधी आणि परंपरांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्यास, तुम्हाला बीडच्या संस्कृतीचा अनोखा अनुभव घेता येईल.
२. श्री योगेश्वरी माता मंदिर:
देवी योगेश्वरी मातेला समर्पित हे मंदिर आध्यात्मिक स्थळ असून, इथे भक्त आशीर्वाद घेण्यासाठी आणि मनःशांती मिळवण्यासाठी येतात.
३. श्री वैजनाथ मंदिर, परळी:
भगवान शंकराला समर्पित हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हिंदू धर्मात याला मोठं महत्त्व आहे आणि त्यामुळे इथे अनेक धार्मिक लोक दरवर्षी भेट देतात.
४. श्री मुकुंद महाराज मंदिर, अंबाजोगाई:
अंबाजोगाई येथील हे पवित्र ठिकाण संत श्री मुकुंद महाराज यांच्याशी जोडलेले आहे. हे मंदिर आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचं केंद्र मानलं जातं.
५. श्री कंकाळेश्वर मंदिर:
या मंदिराची कलात्मक वास्तुकला पाहण्यासाठी लोक येतात. या वास्तूतील बारकावे बीडच्या प्राचीन सांस्कृतिक जडणघडणीचे दर्शन घडवतात.
६. कपिलधार मंदिर:
सुंदर कपिलधारा धबधब्याच्या जवळच हे मंदिर आहे. निसर्गाच्या सान्निध्यात एक शांत आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवण्यासाठी हे ठिकाण योग्य आहे. - गड आणि किल्ले
१. बीड किल्ला हा आणखी एक ऐतिहासिक ठेवा आहे, जो युद्ध आणि विजयाच्या कथा सांगतो. किल्ल्यावरून दिसणारे विहंगम दृश्य खास आहे, जे तुमला कायमच्या आठवणी देईल.
२. धारूर किल्ला:
हा प्राचीन किल्ला बीडच्या इतिहासाचा दाखला देतो आणि त्याच्या भग्न भिंती त्याच्या वैभवशाली काळाच्या कथा सांगतात. कमी प्रसिद्ध असलेला हा किल्ला कमी गर्दी मुळे तुम्हाला नक्कीच एक वेगळा आनंद देईल. - निसर्ग पर्यटन
बीड जिल्हा केवळ सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशासाठीच प्रसिद्ध नाही, तर हे निसर्गप्रेमी आणि साहसप्रिय पर्यटकांसाठी देखील एक सुंदर ठिकाणं आहे. सुंदर धबधबे आणि शांत जलाशयांनी भरलेले हे ठिकाण नक्कीच तुमच्या यादीत असलं पाहिजे.
१. सौताडा धबधबा:
सौताडा गावात लपलेला हा सुंदर धबधबा निसर्गप्रेमी लोकांसाठी नक्कीच एक विशेष आकर्षण आहे. हिरव्यागार परिसरातून कोसळणारे पाणी, शांत आणि आल्हाददायक वातावरण तयार करते. विशेषतः पावसाळ्यात, धबधब्याचा प्रवाह अधिक वाढल्यावर, त्याचं सौंदर्य अवर्णनीय असते.
२. कपिलधारा धबधबा:
कपिलधार मंदिराजवळ वसलेला हा मनमोहक धबधबा बीड जिल्ह्याचं आणखी एक रत्न आहे. खडकाळ कड्यावरून पडणाऱ्या या धबधब्याभोवती हिरवीगार झाडी आहे, ज्यामुळे इथे एक शांत निवांत वेळ घालवता येतो. पाण्याचा आवाज आणि नैसर्गिक सौंदर्य यामुळे हे ठिकाण छायाचित्रकारांसाठी देखील आदर्श ठिकाण आहे.
३. बिंदुसरा धरण:
बीड शहराच्या जवळ असलेलं बिंदुसरा धरण हे पाणी साठवण्याचं मोठं साधन तर आहेच, पण तितकंच सुंदर पर्यटनस्थळही आहे. धरणाचं स्थिर पाणी, सभोवतालच्या डोंगररांगा आणि हिरवाई यांनी तयार झालेलं निसर्गरम्य दृश्य इथे येणाऱ्यांना मोहून टाकतं. कुटुंब आणि मित्रांसोबत निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. - अन्य आकर्षणे
१. शिवाजी महाराज चौक:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना समर्पित हा प्रमुख चौक मराठा साम्राज्याचा वारसा असून बीडच्या जनतेवर त्यांच्या अजूनही असलेल्या प्रभावाचं प्रतिक आहे.
२. खजाना बावडी:
खजाना बावडी हि खास पाण्याचा साठा करण्यासाठी तयार केलेली विहीर, प्राचीन स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. इतिहास प्रेमींसाठी हे ठिकाण विशेष आकर्षण ठरतं.
बीड जिल्ह्यातील निसर्ग, मंदिरे आणि स्मारके, जिल्ह्याच्या आध्यात्मिक संपन्नतेचा आणि ऐतिहासिक काळाचा तुमच्या मनावर ठसा उमटवतात. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा शोधणाऱ्या पर्यटकांसाठी बीड हा एक महत्त्वाचे ठिकाण आहे.
भेट देण्यासाठी उत्तम काळ
हिवाळा (ऑक्टोबर ते फेब्रुवारी) हा बीड जिल्हा पाहण्यासाठी सर्वात योग्य काळ आहे. या काळातील गारवा सहलीसाठी आणि भटकंतीसाठी एकदम योग्य पर्याय ठरतो.
हंगाम | कालावधी | बीड जिल्ह्यातील परिस्थिती | प्रवासाची सूचना |
हिवाळा | ऑक्टोबर ते फेब्रुवारी | गारवा – सहलीसाठी आणि बाहेरच्या उपक्रमांसाठी योग्य | हा काळ सर्वात योग्य आहे. |
उन्हाळा | मार्च ते मे | खूप उष्ण, जास्त तापमान | उष्ण हवामान प्रवासात अडथळा आणू शकतो. तापमान कमी झाल्यावर यात्रा नियोजित करा. |
पावसाळा | जून ते सप्टेंबर | निसर्ग हिरवागार आणि योग्य प्रमाणात पाऊस | पावसाचा आनंद घेत प्रवास सुखद होऊ शकतो. |
बीडला का भेट द्यावी?
बीड जिल्हा अल्पपरिचीत असूनही त्याचा समृद्ध इतिहास आणि सजीव संस्कृती तुम्हाला खुणावते. प्राचीन ऐतिहासिक स्थळांपासून, निसर्गरम्य दृष्य आणि चवदार खाद्यपदार्थांपर्यंत, प्रत्येक प्रकारच्या प्रवाशासाठी इथे काही ना काहीतरी खास आहे. येथे तुम्हाला मैत्रीपूर्ण स्थानिक लोक आणि शांत वातावरण यामुळे एक अविस्मरणीय अनुभव मिळेल.
बीडच्या कमी लोकांना माहित असलेल्या वाटांचा शोध घ्यायचा आहे का? मग तुमची बीडची सहल आत्ताच नियोजित करा आणि अविस्मरणीय अशा आठवणींसाठी एक वेगळा प्रवास सुरू करा!
Travel Essentials
Here are the travel essentials one should know
Top Attractions
Discover the beauty and culture of Maharashtra through our curated experiences

Kankaleshwar Temple
This ancient Shiva temple is known for its intricate architectural design and historical significance. The temple is surrounded by a large water tank, adding to its serene atmosphere.

Parli Vaijnath
One of the twelve Jyotirlinga shrines dedicated to Lord Shiva, Parli Vaijnath attracts numerous devotees. The temple is known for its spiritual significance and beautiful architecture.

Dharur Fort
Dharur Fort is a historic fort in Beed district, Maharashtra, known for its strategic significance and architectural heritage.

Kapildhar Falls
Located near Dharur in Beed district, Kapildhar Falls is a beautiful waterfall surrounded by lush greenery. It is a popular spot for picnics and trekking, offering a refreshing experience in the lap of nature. The area around the falls is perfect for nature walks and enjoying the serene environment.

Yogeshwari Mata Mandir, Ambajogai
Shri Yogeshwari is a Bhushan of Ambanagari. In the first place, untouchables have embraced literary and culturally respectable Maharashtrian minds. Two of them are remarkable about the poet’s composition Shri Mukundraj and the mausoleum of Navkot Narayan Sant poet Dasopant of Marathi literature. The importance of Ambanagari has increased due to this reason, and in ancient times, this city was sitting in other cities like Bushan ghost (Nagar Bhushan Bhav).

Kholeshwar Temple
This is a temple with historical importance now under archaeological control. It was built by Rani Laxmi in the Rashtrakuta Dynasty. Built in Hemadpanthi style is it unique in itself. Entrance gate, central dome and the mandir dome. It is a lord Shiva temple and is still in use.